Home शासकीय विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश –  दीपक केसरकर

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश –  दीपक केसरकर

1 min read
0
0
34

no images were found

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश –  दीपक केसरकर

 

            मुंबई : येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे नवी मुंबईतील वाशी आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेलअशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

            मंत्री श्री.केसरकर यांनी आज विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाचा आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधवराज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्थेला देण्यात आली आहे.

            जानेवारी 2023 मधील विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत प्राप्त अभिप्रायांचा विचार करून आणि विश्व संमेलनाचा हेतू विचारात घेता मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ ही या विश्व संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

            संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीविश्व मराठी संमेलनासाठी जगभरातून मराठी भाषक प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यासमोर मराठी भाषेतील दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे. ग्रंथ दिंडीढोल ताशाविद्यार्थ्यांचे लेझीम पथकांच्या सादरीकरणाद्वारे मराठमोळ्या वातावरणात सर्वांचे स्वागत व्हावे. महाराष्ट्राचीमराठी भाषेची महती सांगणारीमराठी माणसांना जोडून ठेवणारी गीतेबोलीभाषेतून कला सादर करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रमकविता वाचनअभिवाचनमहाराष्ट्राचा इतिहाससंत साहित्याचा इतिहास अशा विविध कार्यक्रमांद्वारे उद्घाटनाचा सोहळा आयोजित व्हावा.

            संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये मराठमोळा वस्त्र सोहळाखाद्य संस्कृतीव्यवहारात मराठीचा वापरमराठी उद्योजकांचा परिसंवादतरुणाईमध्ये मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी उपाययोजनाप्रसारमाध्यमांच्या मराठी संपादक/ वाहिनी प्रमुखांशी संवादपुस्तक निर्मितीचा प्रवास जाणून घेण्यासाठी लेखक ते प्रकाशक यांच्याशी संवादभावगीतेशास्त्रीय संगीत आदींवर आधारित कार्यक्रमांचा समावेश करावाअशी सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

            मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये योगदान दिलेल्या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा. राज्याबरोबरच इतर राज्य आणि परदेशातून मराठी भाषक येणार आहेत. त्यांनाही सहभागी करून घेण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…