
no images were found
कमल हसनच्या ‘सदमा’तील व्यक्तिरेखेवरून रोहित सुचांतीने घेतली प्रेरणा!
गेली दोन वर्षे लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि रिषी (रोहित सुचांती) यांच्या जीवनात येणार््या अनपेक्षित कलाटण्या आणि मन गुंतवून ठेवणारे कथानक याद्वारे ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचा स्वत:चा असा निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार झाला असून दिवसेंदिवस #RishMi यांच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की लक्ष्मीला वाचवण्यासाठी रिषीने केलेल्या अनेक प्रयत्नांनंतरही लक्ष्मीला मनोरुग्णालयात घेऊन गेले जाते. तिला या रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी रिषी जिवापाड प्रयत्न करत आहे. पण वास्तव जीवनात आपल्यातील अभिनेत्याचा कस लागेल अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी आल्यामुळे रोहित सुचांती खुशीत आहे.तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना चांगली आणि संवेदनशील वागणूक देतानाच अशा रुग्णांशी संयम आणि संवेदनशीलतेने वागले पाहिजे, याकडे त्याने लक्ष वेधले.
या मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी नातेसंबंधांत रिषीची काळजी घेणार््या एका परिपक्व लक्ष्मीला पाहिले आहे. आता एका जिवावरील अपघातात आपली स्मृती गेल्यामुळे मानसिक रुग्ण बनलेल्या लक्ष्मीची काळजी घेण्याची रिषीची पाळी आहे. रोहितने ही व्यक्तिरेखा सुरेखपणे साकारली असून अशी संवेदनशील व्यक्तिरेखा साकारल्यामुळे आपल्यात घडलेल्या बदलांची माहिती रोहितने दिली.
रोहित सुचांती म्हणाला, “मालिकेचा सध्याचा कथाभाग खूपच रंजक झाला असून रिषीच्या व्यक्तिरेखेनं चक्क 360 अंशांचं वळण घेतल्याने चित्रीकरण करताना मला कूप मजा येत आहे. लक्ष्मी अशी का वागत आहे, ते कोणाला ठाऊक नसल्याने ते तिला वेडी म्हणत आहेत. पण रिषीचा तिच्यावर विश्वास असून तो तिची खूप काळजी घेत आहे. या कथाभागाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यापूर्वी आमच्या टीमने मला कमल हसन सरांच्या सदमा चित्रपटातील व्यक्तिरेखेची टेप दिली आणि माझी व्यक्तिरेखा त्यांच्या भूमिकेवर आधारित असावी, अशी सूचना केली. हा चित्रपट एक मास्टरपीस आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. मी हा चित्रपट पाहिला आणि रिषीच्या व्यक्तिरेखेत कोणते बदल होतील, याचा मला अंदाज आला.”
तो पुढे म्हणाला, “वास्तव जीवनात असे प्रसंग अनेकदा घडतात, पण जे मानसिक रोगाशी लढत असतात, अशा रुग्णांबाबत लोक संवेदनशीलतेने वागत नाहीत. पण रिषीच्या व्यक्तिरेखेचा हा टप्पा साकार केल्यानंतर मानसिक रुग्ण असलेल्या लोकांबरोबर किती संयम आणि संवेदनशीलतेनं वागावं लागतं, याचा अंदाज मला आला आहे. या कथाभागाद्वारे आम्ही प्रेक्षकांना एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांची छोटीशी मदतही अशा मानसिक रुग्णांसाठी खूप काही करू शकते. सध्याच्या कथाभागात ऐश्वर्याने लक्ष्मीची व्यक्तिरेखा अप्रतिमपणे साकारली आहे. प्रेक्षकही आमच्यावर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करतील, अशी मी आशा करतो.”
रिषीच्या व्यक्तिरेखेतील रोहितच्या या संवेदनशील पैलूने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, पण मालिकेत आगामी भागांमध्ये नाट्यपूर्ण घटना घडणार आहेत. बलविंदर (अंकित भाटिया) लक्ष्मीला पळवून नेतो आणि आपला कुटिल कट प्रत्यक्षात आणतो. पण तत्पूर्वी, ऐन वेळी लक्ष्मीला त्याच्यापासून वाचिवण्यात रिषीला यश येईल का? की तो तिला कायमची गमावून बसेल?