no images were found
म्हशींचंही बनणार आधार कार्ड; नरेंद्र मोदी
नोएडा : आधार कार्डचीमुळे नागरिकांचे काम सोपं झालं आहे. त्यामुळं लोकांची ओळख सोपी होण्यासोबत फसवणुकीचे अनेक प्रकारावरही आळा बसला आहे. त्या यशामुळे प्रोत्साहित होऊन सरकार प्राण्यांचं ‘आधार कार्ड’ही बनवण्याच्या तयारीत आहे. याबाद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणाही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली असून याबाबतची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आगामी काळात माणसांप्रमाणं चक्क म्हशींचे देखील आधार कार्ड काढण्यात येणार आहे. ‘पशु आधार’ असं या मोहिमेचं नाव आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळं मदत होईल, असे मोदींनी मत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन झालं. याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. देशातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात असून देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जात आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केलं जाणार असल्याचे मोदी म्हणाले. आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार असल्याचे मोदींनी सांगितलं.