Home Uncategorized  मी विमानातून उडी मारली नाही, तर…;      

 मी विमानातून उडी मारली नाही, तर…;      

30 second read
0
0
61

no images were found

        मी विमानातून उडी मारली नाही, तर…;                     अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील जखमींना भेट दिली. अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ घेताच झालेल्या विमान अपघातातून फक्त एकच व्यक्ती जिंवत वाचला. एका व्यक्ती सोडला तर विमानातील सर्व लोकांचा जळून कोळसा झाला. अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. मी विमानातून उडी मारली नाही, तर दुर्घटनेनंतर सीटसहित बाहेर फेकलो गेलो’, असे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

       अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाचा गुरुवारी दुपारी १.३८ वाजता भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ घेताच दोन मिनिटात विमानाचा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकलं. या विमानातील २४२ लोकांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.

       ४० वर्षीय रमेश विश्वास कुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत. ते भारतातील कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते .ते विमानातील विमानाच्या ११ ए सीटवर बसले होते. तर त्यांचा भाऊ दुसऱ्या रांगेत बसला होता. घटनेच्या काही मिनिटानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अपघातानंतर रमेश विश्वास कुमार रक्तबंबाळ झाले होते.

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमेश विश्वास कुमार यांना धीर दिला. तसेच लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली. विश्वास यांची तब्येत आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विश्वास आता शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांतून जात आहे.          

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…