no images were found
दल सरोवरातील शिकारा सफर अन् हाऊसबोटमध्ये शूटिंगचा अनुभव सुरेखच होता
सोनी सबवरील प्रेमगाथा ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ ही मालिका जवळपास गेल्या दोन दशकांत काश्मिरातील नयनरम्य स्थळांवर चित्रित होणारी पहिलीच मालिका ठरली आहे. काश्मीर खोऱ्यावर बेतलेल्या या मालिकेच्या माध्यमातून निर्मात्यांना अस्सल काश्मिरी अनुभूती द्यायची होती. यामुळे त्यांनी काश्मिरातील अस्सल स्थळांवरच मालिकेचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेच्या मध्यवर्ती भूमिकेत इशा शर्मा आणि राघव म्हणून निशांत मलकानी हे झळकत आहेत. तसेच यात दूरचित्रवाणीवरील ख्यातनाम अभिनेते हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान हेही छोट्या पडद्यावर परतले आहेत.कलाकारांनी काश्मिरातील चित्रीकरण आटोपल्यानंतर, मालिकेत अविनाश शर्माची व्यक्तिरेखा निभावणारा अभिनेता हितेन याने काश्मिरातील चित्रीकरणाचा आपला अनुभव विशद केला. या लक्षवेधक प्रवासातील काही संस्मरणीय अन् काही आव्हानात्मक क्षणांचाही उल्लेख त्याने या वेळी केला.
चित्रीकरणाच्या आपला अनुभव सांगताना हितेन म्हणाला की, “काश्मिरात शूटिंग करणे हा माझ्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या थरारक अनुभव राहिला. हा माझ्यासाठी पहिलाच प्रकारचा असा अनुभव राहिला. कारण इतक्या मोठ्या काळाच्या शूटिंगसाठी मी कधीच बाहेरगावी गेलेलो नव्हतो. मुंबईतील आमच्या नेहमीच्या शूट्सच्या तूलनेत काश्मिरातील अनुभव हा सर्वस्वी वेगळाच होता. ज्या हाऊसबोटमध्ये आमचे चित्रीकरण होत होते, तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला शिकारात बसून जावे लागायचे. हा दैवी अनुभव होता. काश्मीर हा खरोखरीच भूतलावरील स्वर्ग आहे. इतकेच नव्हे तर श्रीनगरमधील वेगवेगळ्या स्थळांना भेट देण्याचीही संधी मला पहिल्यांदाच मिळाली. या शहराचे सौंदर्य खरोखरीच मनाला भुरळ पाडणारे आहे. पश्मिनासाठी चित्रीकरणाच्या अनुभवाने मला काही संस्मरणीय आठवणींचा ठेवा मिळाला आहे, जो जन्मभर माझ्यासोबत राहील. मला ही संधी मिळाल्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहील.”
तथापि, हितेन आणि इतर कलाकार मंडळींसाठी काश्मिरात चित्रीकरण करण्याचा अनुभव काही आव्हानेही घेऊन आला. त्याबाबत अधिक माहिती देताना हितेन म्हणाला की, “प्रोडक्शन टीमने त्यांच्या वाट्याला आलेल्या आव्हानांचा सामना केला. विशेषकरून दुर्गम स्थळे आणि बेभरवशाच्या हवामानाच्या आव्हानांना ते समोरे गेले. वेळापत्रक अॅडजस्ट करणे, पहाटेचे चित्रीकरण आणि मध्यरात्रीचे वेक अप कॉल्स तर नित्यनियमाचे बनून गेले होते. सुरुवातीला इथल्या वातावरणाशी जुळून घेणे कठीण गेले. यात आऊटडोअर शूटिंगदरम्यान लेअर अप करण्यात अपयशी ठरणे आणि कडाक्याच्या थंडीत मौखिक संवाद बोलणे जरा अवघडच गेले. मात्र हळूहळू आम्ही जुळवून घ्यायला शिकलो. तेथे बराच वेळ घालवल्यामुळे वातावरणात आम्ही चांगलेच सामावून गेलाे होतो.”