
no images were found
धर्मेंद्र अन् जितेंद्रच्या नकारामुळे अमिताभ ठरले बॉलिवूडचा ‘डॉन’
बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन जवळपास ५ दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा त्यांच्यात प्रचंड उत्साह, उर्जा आणि कामाप्रती प्रेम आहे त्यामुळे आजही ते कलाविश्वात सक्रीय आहेत. ७० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे डॉन . हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला. परंतु, या सिनेमासाठी अमिताभ बच्चन पहिली पसंती नव्हते. त्यांच्या ऐवजी इंडस्ट्रीतल्या ३ दिग्गज कलाकारांना हा सिनेमा ऑफर झाला होता. अमिताभ यांचा डॉन हा सिनेमा १९७८ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात झीनत अमान, प्राण आणि मॅक मोहन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. हा सिनेमा पाहण्यासाठी त्याकाळी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर अक्षरश: रांगा लावल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या सिनेमाकडे बॉलिवूडच्या तीन टॉपच्या अभिनेत्यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे हा सिनेमा सुपरडूपर हिट झाला.
रिपोर्टनुसार, डॉन सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. परंतु, त्यांच्यापूर्वी जितेंद्, धर्मेंद्र आणि देव आनंद यांना हा सिनेमा ऑफर झाला होता. पण, या तिघांनीही काही ना काही कारणं देत ही ऑफर नाकारली. त्यानंतर या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना विचारणा करण्यात आली.
दरम्यान, हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. या सिनेमातील खईके पान बनारस वाला हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.