Home राजकीय संजय राऊत यांनी खुशाल स्वप्न बघावं – उदय सामंत

संजय राऊत यांनी खुशाल स्वप्न बघावं – उदय सामंत

0 second read
0
0
20

no images were found

संजय राऊत यांनी खुशाल स्वप्न बघावं – उदय सामंत

मध्य प्रदेशात भाजपाला ८० जागा मिळतील असा सर्व्हे होता, राजस्थानमध्ये ७५ जागा मिळतील सर्व्हे होता. मात्र तिकडे भाजपाला उत्तम यश मिळालं. आम्ही लोकसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकू असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ४८ जागा महायुती जिंकणार आहे तर आमच्या समोर जी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ती ४९ जागा जिंकेल असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
२०२४ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना क्रमांक एकचा पक्ष होईल असं वक्तव्य समोर आलं. त्यावर विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “स्वप्नं कुणीही पाहू शकतं., मी असं म्हणू शकतं मला बायडेन व्हायचं आहे. जे काही बोलतो त्यात तारतम्य असलं पाहिजे. परवाच्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामुळे २३०० पैकी १७०० महायुतीने जिंकल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाही आम्ही जिंकल्या. आम्ही जर सगळ्याच निवडणुका जिंकतोय तर मला वाटतं संजय राऊत यांनी स्वप्नं पाहावं काही हरकत नाही.” असा टोलाही उदय सामंत यांनी लगावला.
जागावाटपाचा निर्णय आमचे तीन नेते घेतील
जागावाटपाचा निर्णय आमचे तीन नेते घेतील. जे काही योग्य असेल ते ठरवतील आमचे तिन्ही नेते तो निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. आजपर्यंत आमच्या युतीत स्वयंघोषित कुणीही नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे ठरवतील ते महायुतीतल्या पक्षांनी मान्य केलं पाहिजे. हे तिन्ही नेते योग्य पद्धतीने निर्णय घेतील असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४८ जागा जिंकाव्यात यासाठी आमचे तिन्ही नेते प्रयत्न आणि नियोजन करत आहेत. आमचे खासदार निवडून येतील असं उदय सामंत म्हणाले तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही बोचरी टीका केली. करोना काळात पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. करोना काळात त्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे आणि आता आम्हाला हे सांगत आहेत असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…