no images were found
मनाच्या स्वास्थ्यासाठी योग आणि संगीताचा अभ्यास आवश्यक – डॉ.सौ. भाग्यश्री मुळे
दिनांक २९ व ३० डिसेंबर २०२३ रोजी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने दोन दिवसीय ‘सुगम संगीत’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी कोल्हापूरातील प्रसिद्ध संगीत अभ्यासक, गायिका व योगतज्ञ डॉ. सौ. भाग्यश्री मुळे यांनी योगसंगीत व सुगमसंगीताचे विविध पैलू या विषयी उपस्थित विद्यार्थी, जिज्ञासु ,संगीत अभ्यासक यांना बहुमोल मार्गदर्शन केले. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योग आणि संगीत यांचा एकत्रित अभ्यास करणे कसे उपयुक्त ठरते हे डॉ. मुळे यांनी विविध
उदाहरणांतून सहजतेने विषद केले. योगशास्त्राची विविध तत्वे व संगीत यांची उत्तम सांगड घालणारे अभ्यासपूर्ण विवेचन तसेच सुगम संगीताचे विविध पैलू उलगडताना त्यांनी सुगम नाद विचार, लय ताल विचार, साहित्य विचार, सौंदर्य विचार, सादरीकरण, मानसशास्त्र, वाद्यवृंद संयोजन आदी मुद्द्यांविषयी आपले अभ्यासपूर्ण विवेचन वैविध्यपूर्ण गीते सदर करून स्पष्ट केले. त्यांना श्री. निनाद खाडिलकर यांनी स्वरसाथ तर गौरी कुलकर्णी यांनी संवादिनी साथ, श्री. संदेश गावंदे यांनी तबलासाथ केली. पाहुण्यांचे स्वागत विभागप्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद ठाकूरदेसाई, तर श्री. अतुल परिट यांनी आभार मानले. या प्रसंगी तबला विभागाचे डॉ. निखील भगत तसेच विभागातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.