Home आरोग्य न्यू वुमन्स फार्मसीच्या विद्यार्थीनींनी केला आरोग्य संपन्न नववर्षाची सुरुवात

न्यू वुमन्स फार्मसीच्या विद्यार्थीनींनी केला आरोग्य संपन्न नववर्षाची सुरुवात

0 second read
0
0
110

no images were found

न्यू वुमन्स फार्मसीच्या विद्यार्थीनींनी केला आरोग्य संपन्न नववर्षाची सुरुवात
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : येथील श्री प्रिन्स शिवाजी महाराज बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीने नविन वर्षाची सुरुवात विधायक उपक्रमाने केली. यामध्ये स्लिमपॉसिबल व न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्तं विद्यमाने विद्यार्थिनींसाठी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वावरताना शरीरासाठी आवश्यक व्यायामाची गरज, त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून झुंबा, एरोबिक्स चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शाहु महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली. सुरुवातीला स्लिमपॉसिबलच्या रशिदा मकानदार यांनी विशेषत: महिलांसाठी आवश्यक असणारा पोषक आहार, शरीरासाठी लागणारी पोषणमूल्ये ,व्यायाम व तंदुरुस्त कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थिनीनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेवून नविन वर्षाची सुरुवात पोषक आहार, तंदुरुस्त शरीरासाठी योगा, एरोबिक्स व व्यायाम करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पीयुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा.वैष्णवी निवेकर यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी स्लिमपॉसिबलचे कोच मासुम मकानदार, शरद गणेशाचार्य व सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील, व्हा. चेअरमन श्री. डी.जी. किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …