
no images were found
काजोल विलेनच्या भूमिकेत दिसणार?
मुंबई : अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख केली. मोठ्या पडद्यावर प्रमुख अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका साकारलेल्या काजोलने नुकताच ओटीटीवर डेब्यू केला आहे. काजोलने द ट्रायल या वेब सीरिजमधून धमाकेदार एन्ट्री केली असून तिच्या नव्या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. काजोलने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
काजोलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. तिने नेटफ्लिक्सवरील शो हॅनिबल ही लोकप्रिय भूमिका साकारण्याची इच्छा जाहीर केली होती, जो एक विलेन असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काजोलने AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर केला आहे.
काजोलने तिच्या इन्स्टावर हॅनिबल अवतार शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती संपू्र्ण ब्लॅक आउटफिट दिसते आहे. काजोलने हा लूक शेअर करत तिला हा AI ने क्रिएट केलेला लूक आवडला असून, संधी मिळाल्यास हा लूक कधी करायला आवडेल असं तिने म्हटलं आहे. तिने एका मुलाखतीतही हॅनिबलची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय तिने आपल्या प्रोजेक्टचं लक्ष्य शेअर करत आपल्या आवडच्या विलेनचं नाव हॅशटॅगसह
काजोलच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. युजरने काजोलला अजय देवगनसोबत प्यार तो होना ही था पार्ट २ काढण्याचं सांगितलं आहे. तर एकाने काजोलला अशा विलेनच्या भूमिका साकारण्याचं सांगितलं आहे.