Home शैक्षणिक  जिल्हास्तरीय एकदिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न…!

 जिल्हास्तरीय एकदिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न…!

20 second read
0
0
33

no images were found

 जिल्हास्तरीय एकदिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न…!

कोल्हापूर(प्रतिनिधी): ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक
दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शिक्षणशास्त्र सभागृह शिवाजी विद्यापीठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
          कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहकतिर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व रोपांना पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय कोल्हापूर शहर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी केले तर ग्राहकगीत सौ.आरती पोतनीस यांनी गायले. यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी.जे.पाटील यांनी जिल्ह्यातील कामाचा आढावा सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आर.जी.पवार यांनी आजीवन अध्ययन ही एका क्षेत्राशी निगडीत नसुन ती सामाजिक उपक्रम बाबत आहे त्यामुळे ग्राहक पंचायतीस नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
       प्रमुख पाहुणे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिता नेर्लीकर यांनी पुरवठा विभाग मार्फत राबविण्यात येत असलेली माहिती सांगत शासन ग्राहक हिताच्या अनेक योजना राबवत आहे. लोकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी ग्राहक कार्यकर्तेनी प्रयत्न करून विविध उपक्रमाचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणेत यावा असे सांगितले. ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुणजी वाघमारे म्हणाले की कार्यकर्त्यांनी परिपूर्ण माहिती घेऊन प्रशासनातील बिभीषण शोधून संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहारासह पाठपुरावा करावा तसेच कार्यकर्ता कसा असावा, त्याची कर्तव्य काय, ग्राहकांचे प्रश्न कसे सोडवायचे,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कोल्हापुर जिल्ह्यातील ग्राहक चळवळीचे कार्य पाहून जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांची पुणे विभागातुन आदर्श कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात येत असल्याचे सांगितले.
         या कार्यशाळेस राज्य सहसचिव प्रा.एस.एन.पाटील ,राज्य सदस्या- सुनिता राजेघाडगे, राज्यसंघटक-सर्जेराव जाधव (गुरुजी), स्टेट बँक ऑफ इंडियाचे अनुपम गुप्ता यांनी बँकिंग क्षेत्रातील माहिती देत मार्गदर्शन केले. यानंतर सल्लागार अॅड.बी.एम.पाटील यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांबरोबर ग्राहक कार्यकर्त्यांचा प्रश्नोत्तरासह शंका निरसन करण्यात आले.
         कार्यशाळेस जिल्हा उपाध्यक्ष-सुधाकर भदरगे, सतिश फणसे, सचिव- दादासो शेलार, सहसचिव-सुरेंद्र दास, सह सघटक- सदाशिव आंबी, सदस्या- मेघाराणी जाधव,बाजीराव कदम,रमेश कुमार मिठारी,भास्कर माने,गौरव तोरस्कार,यांच्यासह जिल्ह्यातील आजरा,चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा व राधानगरी, कोल्हापूर महानगर, इचलकरंजी महानगर, करवीर तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा संघटक-सुरेश माने व  महिला संघटक -पुनम देसाई यांनी केले व आभार प्रा.सुकूमार नरंदेकर यांनी केले.  कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यकर्तेंना *आदर्श ग्राहक कार्यकर्ता* म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…