Home औद्योगिक बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे प्रत्येक भारतीयाला इन्श्युरन्सच्या कक्षेत आणण्याचे ध्येय

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे प्रत्येक भारतीयाला इन्श्युरन्सच्या कक्षेत आणण्याचे ध्येय

11 second read
0
0
32

no images were found

 

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे प्रत्येक भारतीयाला इन्श्युरन्सच्या कक्षेत आणण्याचे ध्येय

 

कोल्हापूर,  – बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ श्री. तपन सिंघल यांनी सुसज्ज प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पणाचे औचित्य साधून कोल्हापूर नगरीला भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. सिंघल यांच्या समवेत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर व नजीकच्या क्षेत्रातील भागीदारांशी संवाद साधला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. राहुल रेखावारजी आणि वरिष्ठ अध्यक्ष आणि ऑपरेशन्स आणि कस्टमर सर्व्हिसचे प्रमुख श्री. के.व्ही.दीपू यांनी ‘सर्वत्र विमा’ व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला. ‘सर्वत्र विमा’ वाहनाला पुणे येथून मार्गस्थ करण्यात आले आहे. कोल्हापूर क्षेत्रातील नागरिकांच्या इन्श्युरन्स पॉलिसी आणि सेवांची पूर्तता करण्याचे आणि इन्श्युरन्स संबंधित अडचणींवर सर्वोत्तम इन्श्युरन्स उपाय प्रदान करणे आणि इन्श्युरन्स जागरुकता निर्माण करण्याचा यामागील हेतू आहे.

         बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे कोल्हापुरात यापूर्वीच 500 पेक्षा जास्त एजंट्स, 2,000 पेक्षा जास्त बँक खास शाखांचे आणि 200 मोटर डीलर भागीदारांचे विस्तृत नेटवर्क आहे. यामुळे जवळपास 200,000 ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. कोल्हापुर मधील माध्यम प्रतिनिधींच्या वार्तापालावेळी श्री. तपन सिंघल म्हणाले, “ज्या देशात 7% लोकसंख्या दरवर्षी दारिद्याच्या दृष्टचक्रात अडकते. त्यावेळी इन्श्युरन्स एक महत्त्वपूर्ण जीवनरेखा बनते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये आम्ही आव्हानात्मक काळात आर्थिक बोजा कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. कोल्हापुर मधील पुरस्थिती वेळी आम्ही मागील 2 ते 3 वर्षांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त क्लेम दाखल केले आहेत. आम्ही त्वरित क्लेम सेटल करण्याद्वारे आमची विश्वसनीयता सिद्ध केली आहे. आम्ही येथे आमच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केल्यामुळे आकस्मिक परिस्थितीच्या कारणामुळे कोल्हापूर मधील कोणीही दारिद्याच्या चक्रात अडकणार नाही याची सुनिश्चिती आम्ही करतो. तसेच, हे कार्यालय कोल्हापूर प्रदेशाच्या आर्थिक संरक्षण आणि परिवर्तनाच्या या उल्लेखनीय प्रवासाचा मध्यबिंदू ठरेल.”

        श्री. सिंघल पुढे म्हणाले, “आमची संस्था देशभरातील 14 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांसाठी विश्वसनीय भागीदार म्हणून निर्माण झाली आहे. गेल्या 22-वर्षाच्या प्रवासात समाजात परिवर्तन करण्याच्या आणि आवश्यकतेच्या वेळी आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या आमच्या वचनपूर्ती साठी आम्ही नेहमीच बांधील आहोत.”

      दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कंपनीचे एमडी आणि सीईओ असलेले श्री. तपन सिंघल हे जनरल इन्श्युरन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि इन्श्युरन्स आणि पेन्शनवरील सीआयआय राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक व्यक्तीला इन्श्युरन्सच्या कक्षेत आणण्याच्या आमच्या प्रयत्नांवरील मोहोर म्हणजे कोल्हापूरला आमच्या निर्णय प्रक्रियेतील अग्रणी पदाधिकाऱ्यांनी दिलेली भेट मानायला हवी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…