no images were found
हिरे व्यापारी केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
विश्वातील अत्याधुनिक व सर्वात मोठे असलेल्या सुरतमधील व्यापारी केंद्राचे उद्घाटन,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून,हिऱ्यांच्या व दागिन्यांच्या व्यवसायामधील अत्याधुनिक केंद्र आहे.जगात सध्या अंतरराष्ट्रीय वातावरण भारताच्या बाजूकडे असून,संपूर्ण जगात मेक इन इंडिया याची चर्चा सुरू असल्याचे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
सुरत मधील हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारी केंद्राचे उद्घाटन,आज त्यांच्या हस्ते पार पडले.सुरत मध्ये हिऱ्यांचा व्यापार हा फार मोठ्या प्रमाणात होत असून,हिऱ्याला पैलू पाडलेल्या व न पाडलेल्या अशा दोन्हीही व्यापाराचे केंद्रीकरण या केंद्रात होणार आहे.सुरत हे नवयुवकांचे आशास्थान असून,येथील रत्नांची देवाणघेवाण हा जगातील एक फार मोठा व्यवसायाचा भाग आहे.
दरम्यान सुरतमधील केंद्र हे हिऱ्यांच्या व दागिन्यांच्या व्यापारीकरणासाठी,जगातील 125 देशांशी जोडले जाणार असून,सीमाशुल्क सदन,ज्वेलरी मॉल,लॉकर व बँकिंग ची सोय येथे उपलब्ध झालेली आहे.सुरत मधील हिऱ्यांच्या व दागिन्यांच्या व्यवसाय केंद्रामुळे विमानतळाला,आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला असून,कापड,उद्योग,हिरे, पर्यटन,शिक्षण आधी क्षेत्रात,या सुरत मधील अत्याधुनिक केंद्रामुळे लाभ होणार असल्याचे प्रतिपादन,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.एकंदरीतच विश्वातील हिऱ्यांच्या व दागिन्यांच्या व्यवसायातील अत्याधुनिक व सर्वात मोठे असलेले केंद्र म्हणून,सुरत हे लवकरच प्रसिद्धीस येईल असे वाटते.