no images were found
उल्लेखनीय काम केलेल्या 17 कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर: महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेत उल्लेखनीय काम केलेल्या आरोग्य व अग्निशमन विभागातील 17 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेण्यात आला.
यामध्ये अग्निशमन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर दुकानास लागलेल्या भीषण आगीच्या वर्दीवेळी उत्फृष्ठ काम केल्याबद्दल तांडेल रमेश जाधव, राजेंद्र भोसले, किसन पवार, सर्जेराव लोहार व फायरमन रफीक शेख यांचा सत्कार करण्यात आला. तर आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी यांनी कामामध्ये कोणत्याही प्रकारे कसुर केलेला नाही व प्रामाणिकपणे चांगले काम करतात अशा श्रीकांत मोरे, सुशिला गवई, राजू माने, अविनाश चावरे, बाबासाहेब भोसले, रुग्णालयाकडील श्रीमती सुभद्रा शिंदे, शमशुद्दीन जमादार, श्रीमती जयंत जिकमाडे, श्रीमती सुजाता घोरपडे, श्रीमती मीना पौंडकर यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासनाधिकारी एस.के.यादव, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर नगररचना रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आस्थापना अधीक्षक राम काटकर, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.