Home राजकीय राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान’;-देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान’;-देवेंद्र फडणवीस

1 second read
0
0
37

no images were found

राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान -देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय २०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद आहेच, मात्र आगामी लोकसभा निवणुकीचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे फडणवीस म्हणाले. महाविजय २०२४ हे आपलं ध्येय आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचे आहे. मोदींच्या नावावर विजय मिळवू, या अतिआत्मविश्वात राहू नका, अशा भावनेत गेला तर मोदींची मेहनत करतात त्याला साजेसे काम आपल्याकडून होणार नाही. पुढचे ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी खूप काम करावे लागणार आहे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे आभार मानले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. “राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, यासाठी आपल्याला भाग्य घेऊन यावे लागते. काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली. पक्ष, संघटना याचे महत्त्व संपले. काँग्रेसचा नेता मोठा झाला, पण कार्यकर्ता राहिला नाही. देशातील सर्वात जुन्या पक्षात आज ज्या प्रकारची अवस्था दिसते, त्यानुसार हा पक्ष वर येणे कठीण आहे. भाजपामध्ये मात्र असे होत नाही. परवा अमित शाह यांना विचारले, तुम्ही तुमच्या जेष्ठ-एकनिष्ठ नेत्यांना मुख्यंमत्री बनविले नाही. त्यावर अमित शाह म्हणाले की, भाजपात सर्वात एकनिष्ठ कुणी असेल तर तो आमचा कार्यकर्ता आहे. सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा कुणीही मोठा नाही. भाजपामध्येच हे शक्य आहे. आपण नेतृत्वात बदल करत असतो. असे केले नाही, तर नवीन पिढी तयार होत नाही. ज्यांना बाजूला केले जाते, त्यांना वेगळी भूमिका दिली जाते”, असे विधान फडणवीस यांनी केले.
भाजपामधील कार्यपद्धतीचे उदाहरण देत असताना फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमध्ये मात्र असे होत नाही. तिथे ज्या नेत्याला बदलले जाते, तो पक्षाचीच कबर खोदतो. हे फक्त भाजपामध्येच शक्य होते. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च पद होते, त्याला सांगितले की, तुला आता दुसरे काम दिले जाईल, त्यावर तो नेता हसत हसत नवी जबाबदारी स्वीकारतो.”
“भाजपात काही नेत्यांमध्ये मतभेद निश्चित असतील. पण एकमेकांमधून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती नाही. ती निर्माणही होणार नाही. तरीही जेव्हा एका तिकीटाचे दोन उमेदवार असतात, तेव्हा मतमतांतरे निर्माण होतात. पण एक सांगू इच्छितो ही निवडणूक भाजपासाठी नाही तर भारतासाठी लढायची आहे. आपल्याला पुन्हा एकदा भारत मोदींच्या हातात द्यायचा आहे”, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…