Home सामाजिक हौशी खगोलप्रेमींना सुवर्णसंधी – मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव

हौशी खगोलप्रेमींना सुवर्णसंधी – मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव

3 second read
0
0
34

no images were found

हौशी खगोलप्रेमींना सुवर्णसंधी – मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव

दर वर्षी हा उल्का वर्षाव डिसेंबर या महिन्यात होतो ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रभर तेजस्वी असे दिसणार्या उल्का. चंद्रास्त लवकर च होणार या कारणाने खगोलप्रेमींना हि एक सुवर्णसंधी आहे अवकाश निरीक्षणाची.
दिनांक ४ डिसेंबर पासून ते २० डिसेंबर पर्यंत मिथुन राशीतून उल्कावर्षाव होत आहे. या वर्षी १४ डिसेंबर च्या रात्री सर्वात मोठा व नेत्रदीपक असा उल्कावर्षाव पाहण्याची सुवर्णसंधी आहे. चंद्र अस्ता नंतर  साधारणता ताशी १०० ते १५० एवढ्या उल्कांचा वर्षाव मिथुन राशीतून दिसेल अशी शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आपण पाहत असलेला उल्कापात हा पृथी जेव्हा धूमकेतूच्या पट्ट्यातून जाते तेव्हा आपल्याला दिसतो. परंतु मिथुन राशीतून होणार हा उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे नसून ३२०० फेथॉन या लघुग्रहामुळे होणारा उल्कावर्षाव आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरु ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक असा लघुग्रह आहे. या लघुग्रहापासून जे धुळीचे कण निर्माण होतात आणि त्याच्यातून पृथ्वी भ्रमण करते तेव्हा दर वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मिथुन राशीतून उल्कावर्षाव पाहता येतो. जेव्हा हे धुळीचे कण पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांचे वातावरणामधील हवेशी घर्षण होते व ते पेट घेतात व १० ते १५ सेकंदापर्यंत आपल्याला ते दिसू शकतात. साधारणतः पृथ्वीपासून १२० ते ८० किलोमीटर च्या दरम्यान त्यांचे ज्वलन होते त्यावेळीच त्यांचा वेग ताशी ११ ते ७२ किमी/सेकंद इतका असतो. त्यानंतर त्यांचे राखेत रूपांतर होते. त्यातील काही मोठ्या आकाराच्या उल्का संपूर्णपणे न जळता जमिनीपर्यंत पोहचतात. अशा उल्कांचा अभ्यास करून सौरमाला निर्मिती होण्यापूर्वी सूर्याची निर्मिती व उत्क्रांती याच्या विषयी महत्वपूर्ण माहिती मिळते.मिथुन राशीतून होणारा उल्कावर्षाव बघण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नाही. हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी निरभ्र आकाश, मिथुन राशी ओळखण्यासाठी आकाश नकाशा व सहनशीलतेची गरज आहे. सर्वप्रथम शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर व उंच ठिकाण निवडावे जेणेकरून स्वच्छ आणि संपूर्ण आकाश दिसेल. तसेच एखाद्या उंच इमारतीच्या छतावरुन निरीक्षणही करता येईल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी काही तास लागणार असल्याने बसण्यासाठी खुर्ची किंवा झोपून निरीक्षण करण्यासाठी चटई इत्यादींचा उपयोग करावा. अशा ठिकाणावरून आकाश नकाशाच्या साहाय्याने मिथुन राशी ओळखून त्या दिशेने निरीक्षण करत राहावे. साधारणतः एका मिनिटाला १ ते २ उल्का पडताना दिसतील. सूर्य मावळल्या पासून ते पहाटे ४.३० पर्यंत मिथुन राशीतून होणार उल्कावर्षाव पाहता येईल. तसेच १७ ते २४ या दरम्यान लघु सप्तर्षी नक्षत्रातून (Ursids meteor shower) उल्का वर्षाव पाहायला मिळेल. २३ तारखेला जास्तीत जास्त म्हणजे तासाला १० उल्का या वर्षावातून आपल्याला दिसतील अशी माहिती डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली आहे.

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…