no images were found
विश्व शिक्षक काळाची गरज – सुहास पालेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिक्षणशास्त्र आधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे 9 डिसेंबर 2023 रोजी “ग्लोबल एज्युकेशन अँड एज्युकेटर्स एक्स्प्लोरिंग करिअर्स दॅट होल्ड स्पेस” या विषयावर सुहास पालेकारांचे व्याख्यान झाले. सदर व्याख्यानात ते बोलताना म्हणाले आवश्यक माहिती संप्रेषण तंत्रज्ञान युग हे अंतरविरहीत असल्याने शिक्षकांनी वैश्विक शिक्षकाची भूमिका व त्याकरिता आवश्यक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या या युगात अनेक नवनवीन संधी शिक्षकांना उपलब्ध झालेल्या आहेत व त्याकरिता लागणारे कौशल्य देखील बदलले आहे. शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावशाली घटक आहे शिक्षकांचा दृष्टीकोन व त्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रेरणेने विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकते अशी अनेक उदाहरणे आज आपल्या जगात दिसून येतात मात्र याकरिता शिक्षकाने संवेदनशील, संयमी व मूल्याधारित अध्ययन अध्यापन केले पाहिजे. आजच्या युगात तंत्रज्ञानाला अणन्य साधारण महत्त्व आले आहे व त्यासाठी लागणारे कौशल्य देखील बदललेली आहेत शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनात केला पाहिजे व त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्राचा अवलंब केला पाहिजे. पालेकरांनी शिक्षणातील नव्या नव्या संधी व
त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याचे सखोल मार्गदर्शन केले. व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. प्रतिभा पाटणकर, अधिविभागप्रमुख, शिक्षण शास्त्रविभाग यांनी अंतर सेवाकाल व स्टूडेंट मोबिलिटी च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात व विद्यार्थ्यांना वैश्विक शिक्षक व त्यासाठी लागणाऱ्या कौशल्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देतात असे सांगितले. सदर व्याख्यानाचे समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे शिक्षणशास्त्र विभाग, यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रूपाली संपकाळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी अविनाश भाले, किशोर खिलारे व शिक्षण शास्त्र आणि विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी वृंद तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.