Home राजकीय लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाच्या काही खासदारांचा कमळ चिन्हावर लढण्याचे वेध

लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाच्या काही खासदारांचा कमळ चिन्हावर लढण्याचे वेध

2 second read
0
0
23

no images were found

लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाच्या काही खासदारांचा कमळ चिन्हावर लढण्याचे वेध

आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी सुरु झाल्या आहेत. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील निकाल भाजपाच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळे धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर मोदी आणि भाजपाच्या यंत्रणेचा फायदा अधिक होऊ शकतो असे शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही खासदारांच्या मनामध्ये चलबिचल सुरु आहे. पुढील काळात चित्र स्पष्ट होणार असलं तरी सध्या शिंदे गटातील अनेक खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणे फायद्याचे असू शकते असे वाटत आहे.

शिवसेनेत फूट पडल्यावर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र आता भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी शिंदे गटातील काही खासदारांची इच्छा आहे.  यामध्ये श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव –  कृपाल तुमाणे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित आणि गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या काही खासदारांच्या मागणीवर भाजप काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…