Home शासकीय विकसित भारत संकल्प यात्रेचे 10 डिसेंबर रोजी 24 ठिकाणी कार्यक्रम

विकसित भारत संकल्प यात्रेचे 10 डिसेंबर रोजी 24 ठिकाणी कार्यक्रम

7 second read
0
0
29

no images were found

विकसित भारत संकल्प यात्रेचे 10 डिसेंबर रोजी 24 ठिकाणी कार्यक्रम

 

कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेचे 10 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 24 ठिकाणी सकाळी व दुपारी आशा दोन सत्रात कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. 

 दि.10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक, करवीर तालुक्यातील महे, गगनबावडा तालुक्यातील तिसंगी, शिरोळ तालुक्यातील चिपरी, राधानगरी तालुक्यातील फेजवडे, भुदरगड तालुक्यातील फये, शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, कागल तालुक्यातील लिंगनूर (कापशी), चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे,  हातकलंगले तालुक्यातील अतिग्रे, आजरा तालुक्यातील मासोळी व पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे या गावांमध्ये सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरोळ तालुक्यातील जैनापूर, करवीर तालुक्यातील गणेशवाडी, राधानगरी तालुक्यातील रामवाडी, भुदरगड तालुक्यातील देवाकेवाडी, कागल तालुक्यातील कादर्याळ, गडहिंग्लज तालुक्यातील येण्याचेवंडी,   चंदगड तालुक्यातील मुरकुटेवाडी, शाहूवाडी तालुक्यातील थावडे, हातकणंगले तालुक्यातील रूकडी, गगनबावडा तालुक्यातील वेतवडे,आजरा तालुक्यातील वेळवंटी व पन्हाळा तालुक्यातील देवठाणे या गावांमध्ये दुपारच्या सत्रात  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…