Home औद्योगिक स्कॅनिया इंडिया ने पीपीएस मोटर्ससह खाण क्षेत्रासाठी केली भागीदारी

स्कॅनिया इंडिया ने पीपीएस मोटर्ससह खाण क्षेत्रासाठी केली भागीदारी

2 second read
0
0
35

no images were found

स्कॅनिया इंडिया ने पीपीएस मोटर्ससह खाण क्षेत्रासाठी केली भागीदारी

कोल्हापूर,  : स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स प्रा. लि.ने पीपीएस मोटर्ससोबत आपली भागीदारी जाहीर केली. त्यांना भारतातील स्कॅनियच्या खाण टिपरसाठी एकमेव प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. ही भागीदारी विक्री आणि सेवा कार्यांसाठी संपूर्ण भारतभरासाठी असेल. स्कॅनिय इंडियाने नेहमीच तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि नावीन्यपूर्ण तथा टिकाऊ वाहतूक उपाय देण्यावर विश्वास ठेवला आहे. खाणीतील गंभीर बिंदू शोधून, विश्लेषण करून आणि सतत ऑप्टिमाइझ करून तयार केलेले सोल्युशन्स कंपनी पुरवते. त्यामुळे उच्च उपलब्धता, वाढीव उत्पादकता आणि ग्राहकांचा अधिक नफा मिळतो. ही नवीन भागीदारी भारतातील नेटवर्क विस्तार आणि ग्राहकांसाठी सहकार्य करण्याच्या स्कॅनियाच्या आश्वासनाचा पुरावा आहे.

नवीन सहकार्याबद्दल बोलताना स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जोहान पी श्लायटर म्हणाले की,पीपीएस मोटर्ससोबत करारावर स्वाक्षरी करून आम्ही भारतातील आमच्या खाण टिपर विभागावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रभावी युतीचा पाया घातला आहे. आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, आम्ही भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांमध्ये भरीव योगदान देण्याबद्दल आशावादी आहोत.

पीपीएसने संपूर्ण भारतामध्ये सहा प्रादेशिक गोदामे यशस्वीरित्या स्थापित केली आहेत. ही गोदामे खाण साइट्सच्या जवळ आहेत आणि एक मजबूत हब-आणि-स्पोक मॉडेल तयार करून, नागपुरातील स्कॅनियाच्या सेंट्रल वेअरहाऊसशी जोडलेले आहेत. हे हब म्हणजे या भागांसाठी स्मूथ, अखंड आणि जलद पुरवठा साखळी मिळते. या तीन अत्याधुनिक कार्यशाळा स्कॅनियाच्या जागतिक खाण मानकांची पूर्तता करतात. कुशल तंत्रज्ञ आणि नऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन कार्यरत आहेत, जेणेकरुन मोठ्या दुरुस्ती, अपघात दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग कार्यक्षमतेने हाताळता येईल.

भागीदारीबद्दल बोलताना पीपीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव संघवी म्हणाले की, आम्हाला भारतातील खाण ट्रक व्यवसायासाठी स्कॅनियाचे खास वितरक म्हणून भागीदारी करण्यात आनंद होत आहे. स्कॅनियाची उत्पादने आणि सेवांवर ग्राहकांनी दाखवलेला प्रतिसाद आणि विश्वास जबरदस्त आहे. वाहनाच्या संपूर्ण काळात साइटवर उत्पादने आणि सेवांची इकोसिस्टम प्रदान करण्याच्या त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या संभाव्य आणि विद्यमान ग्राहकांच्या सतत संपर्कात असतो. याशिवाय आम्ही सखोल आणि व्यापक कव्हरेज प्रदान करण्यासाठी अतिरिक्त टच पॉइंट तयार करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.

उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी शाश्वतता आणि नावीन्यपूर्ण प्रगत वाहने विकसित करण्यासाठी स्कॅनिया कठोरपणे काम करत आहे. जागतिक स्तरावर स्कॅनियाने इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि नूतनीकरणयोग्य इंधन, स्वायत्त उपाय, सुरक्षा प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये कौशल्य दाखवले आहे. कंपनीने भारतात तंत्रज्ञानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. व्यवसायांना त्यांचे कार्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहकार्य देण्यासाठी खास डिझाइन केलेली प्रगत वाहने आणि सेवा प्रदान करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…