no images were found
प्रियांक खर्गेंच्या विरोधात भाजपाची तीव्र निदर्शने
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्यावतीने बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी 11 वाजता भाजपा जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत प्रियांक खर्गे यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. प्रियांक खर्गेचे करायचे काय खाली डोके वर पाय, प्रियांक खर्गे कोण रे पायतान मारा दोन रे याचबरोबर भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी वरील प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगत स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे उद्धव ठाकरे आज याविषयात का प्रतिक्रिया देत नाहीत असा सवाल केला.
यावेळी भाजपा प्र.का सदस्य राहूल चिकोडे म्हणाले, काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी प्रियांक खर्गेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
सध्या भाजपाचे काम बघून काँग्रेस पक्षाकडे बोलण्यासाठी एकही मुद्दा नसल्याने काँग्रेसचे नेते आपण काय बोलत आहोत याचे भान विसरले आहेत. देशभक्तांच्या अपमानाबद्दल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खर्गे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर आले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेसच्या सततच्या अशा देश भक्तांचा अवमान करण्यामुळे काँग्रेसचेच नेते काँग्रेस पक्षाला नेस्तनाभूत करतील यात शंका नाही असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश साळोखे म्हणाले, कॉंग्रेस सरकार आणि कॉंग्रेस नेते सावरकरांचा अवमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत पण या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या घटनेचा भाजपा यु.मो.तीव्र निषेध करीत आहे.
याप्रसंगी डॉ.राजवर्धन, अजित ठाणेकर, दिग्विजय कालेकर यांनी देखील या घटनेबाबत काँग्रेसचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. यानंतर संतप्त झालेल्या भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंत्री प्रियांक खर्गे याचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित नाना कदम, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, जिल्हा चिटनीस दिग्विजय कालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश साळोखे, विशाल शिराळाकर, प्रदीप उलपे, विजय आगरवाल, अनिल कामत, अशोक लोहार, संदीप कुंभार, हर्षद कुंभोजकर, वल्लभ देसाई, वेदार्थ राजवर्धन, रघुनाथ पाटील, अवधूत भाट्ये, संग्राम जरग, अजित सरनाईक, विजयसिंह खाडे पाटील, रुपेश आडुळकर, सतीश रास्ते, निरंजन घाटगे, युवराज शिंदे, विश्वजीत पवार, सुमित पारखे, रोहित कारंडे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.