Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

2 second read
0
0
34

no images were found

शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

 

कोल्हापूर(प्रतिनिधी ) : संत संताजी जगनाडे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असलेले आणि त्यांचे टाळकरी व लेखनिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …