Home मनोरंजन अर्जुन बिजलानी, शबीर आहलुवालिया आणि नीहारिका रॉय पुन्हा एकदा स्क्रीनवर

अर्जुन बिजलानी, शबीर आहलुवालिया आणि नीहारिका रॉय पुन्हा एकदा स्क्रीनवर

5 second read
0
0
45

no images were found

 

अर्जुन बिजलानी, शबीर आहलुवालिया आणि नीहारिका रॉय पुन्हा एकदा स्क्रीनवर

स्टुडिओ एलएसडी निर्मित लोकप्रिय झी टीव्ही मालिका ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ आणि ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ यांनी भारतभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही आधुनिक काळातील वृंदावनच्या पार्श्वभूमीवरील समकालीन प्रणयकथा आहे आणि सुरूवातीपासून प्रेक्षकांच्या आवडीची राहिलेली आहे. आपले उत्कंठावर्धक कथानक आणि उत्तमप्रकारे लिहिलेल्या व्यक्तिरेखा यांमुळे यशस्वी ठरलेल्या ह्या मालिकेत मोहन शबीर आहलुवालिया, राधा नीहारिका रॉय आणि दामिनी संभाबना मोहन्ती यांच्या भूमिका आहेत. तर ‘प्यार का पहला अध्याय शिवशक्ती’ ही मालिक शिव आणि शक्तीच्या आधुनिक संकल्पनेमध्ये प्रेमाच्या शक्तीचा शोध घेते. ह्या शोमध्ये अर्जुन बिजलानीची शिव आणि निक्की शर्माची शक्तीची भूमिका आहे.

महासंगम एपिसोडच्या आगामी भागामध्ये डॉ.शिव हायजॅक झालेल्या विमानामध्ये राधा, मोहन आणि अन्य सर्व प्रवाशांना दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी शिरताना दिसेल. शिव तिथे प्रवाशावर उपचार करण्यासाठी असला तरी तो खऱ्या बॉम्बच्या जागी खोटा बॉम्ब ठेवण्याची संधीही शोधेल. ह्या दहशतवाद्यांची प्रमुख असलेल्या बाईला तिच्या योजनेमध्ये काहीतरी गडबड झाल्याची शंका येईल आणि ती बॉम्ब सक्रिय करायचे ठरवेल. ऑनस्क्रीन प्रेक्षकांना पुष्कळ नाट्‌य पाहायला मिळणार असून ऑफस्क्रीन दोन्ही प्रमुख कलाकारांमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखांप्रमाणेच छान दृढ नाते निर्माण होत आहे.”  

अर्जुन बिजलानी म्हणाला, “मी यात डॉ.शिवची भूमिका करत आहे आणि महासंगम एपिसोडमध्ये मी राधा, मोहन आणि हायजॅक झालेल्या विमानातील अन्य प्रवाशांना मदत करत आहे. दुसऱ्यांदा मी शबीर आणि नीहारिकासोबत खास महाएपिसोडसाठी काम करत आहे आणि अर्थातच नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत काम करायला खूपच मजा येत आहे. ऑनस्क्रीन आम्ही हाय व्होल्टेज ड्रामा आणि गहन दृश्यांचे चित्रीकरण करत आहोत पण ऑफस्क्रीन आम्ही सेटवर अक्षरशः धमाल करत आहोत. अर्थातच आम्ही निक्कीला मिस करत आहोत. मला वाटतं दोन वेगळ्‌या शोज्‌मधील आवडत्या व्यक्तिरेखा एकाच एपिसोडमध्ये पाहणे हा प्रेक्षकांसाठी खरंच छान अनुभव आहे. ह्या खास महासंगम एपिसोड्‌सच्या माध्यमातून प्रेक्षकांना अप्रतिम अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही सगळेच आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत.”

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …