no images were found
विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामीण भागात मोठया उत्साहात सुरु
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आखण्यात आली आहे. आज अखेर जिल्ह्यात एकुण 136 ग्रामपंचायतींमध्ये ही यात्रा पुर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ राज्य शासनाच्या सहकार्याने लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचवण्याच्या दृष्टिने हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा स्तरावरुन या मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1025 ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 9 व्हॅनमार्फत दररोज 2 ग्रामपंचयतींमध्ये प्रसिध्दी व प्रसार करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
17 केंद्रीय योजनांशी संबंधित माहिती त्या-त्या विभागाने विकसित भारत संकल्प यात्राच्या ऑनलाईन पोर्टलवर दररोज भरावयाची आहे. या योजनेची माहिती देणारे डिजिटल फलक, स्टॉल उभारणी, माहिती पत्रके इत्यादी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या दिवशी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असतील याची खात्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत. तसेच ऑनलाइन माहिती विहित वेळेत भरण्यासाठी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष देऊन खात्री करुन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून संबंधित उपक्रमाची प्रचार, प्रसिध्दी, ग्रामीण विविध समित्यांची स्थापना, संबंधितांचे प्रशिक्षण, लाभार्थी निश्चिती इ. संबंधी प्रशासकीय विभाग प्रमुखांसोबत समन्वय ठेवून या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.