Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल

शिवाजी विद्यापीठात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल

1 min read
0
0
27

no images were found

शिवाजी विद्यापीठात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल

कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुल इमारतीचे भूमीपूजन आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाजवळील एन.सी.सी. भवनच्या मागील बाजूस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुलाची भव्य इमारत उभी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात या इमारतीचे ८७७.८५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन मॅट बसविण्यात येणार आहेत. या संकुलाचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संकुलाचा आराखडा पाहून समाधान व्यक्त केले, तसेच संकुल उभारणीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, डॉ.गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, डॉ. वैभव ढेरे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद आदी विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…