
no images were found
दिशा पटानीचा पारदर्शक टॉप असूनही दिल्या आत्मविश्वासाने पोझ
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या लूकमध्ये हॉटनेसचा तडका जोडण्यात अजिबात मागे-पुढे पाहत नाही. पण यावेळी तिने असे एलिमेंट कमीत कमी असलेले कपडे घातले. तिचे कपडे असे होते की ते दिसायला एकदम स्टायलिश होते,
ती हॉटी आहे जी तिच्या फॅशनसह जबरदस्त स्टाईल गोल देण्यात अजिबात मागे नसते. कधी ही सौंदर्यवती एकदमच क्लीन बोल्ड करते तर कधी ती तिच्या कुल लुक्सने टॉम-बॉय वाईब्स देताना दिसते. अक्षय कुमारसोबत यावेळी दिसलेली दिशा खूपच स्टायलिश दिसत होती पण तिचे कपडे असे होते की आपल्याकडे शहरांशिवाय अन्य ठिकाणी असे कपडे घालण्याचे धाडस कोणीच करू शकणार नाही. कागदापेक्षाही पातळ टॉपमध्ये असूनही दिशा एकदम कॉन्फिडन्सने वावरताना दिसली.
यावेळीही दिशा पटानीने प्रवासाच्या हिशोबाने स्वत:साठी असे कपडे निवडले होते, जे दिसायला स्टायलिश आणि कम्फर्टेबल वाटत होते. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांचा कलर टोन डार्कर शेडचा होता. मोरपंखी रंगाचे हे रंगीबेरंगी कपडे तिच्यावर छान दिसत होते आणि दिशा देखील यात अगदी ढासू पोझ देताना दिसली.यावेळी दिशाने डेनिम फॅब्रिकची कार्गो पँट घातली होती. यासोबत तिने हिरव्या रंगाचा वूलन वीव्ह टॉप पेअर केला होता, ज्यावर गुलाबी आणि फिकट हिरव्या रंगाचे आडवे पट्टे दिसून येत होते. अॅक्सेसरीज कमीत कमी ठेवून दिशाने तिचे आवडते क्रॉस पेंडेंट आणि सोन्याची चेन घातली होती.
दिशाचा लुक कॉपी करायचा असेल तर नक्की करा. त्यातही तुम्ही नक्कीच छान दिसाल. मात्र, तुम्ही गावाला जात असलं तर हा टॉप तुमच्यासाठी काही उपयोगाचा नाही. दिशाने परिधान केलेला लोकरीचा टॉप इतका पातळ होता की ती सी थ्रू कॅटेगरी मधलाच वाटत होता. गावच्या लोकांना मुळात हे पटणार नाही आणि दुसरं म्हणजे गावाला एवढी थंडी असेल की तिथे हा लुक काही कामाचा नाही.
टॉप नाही पण दिशाची पँट तुम्ही हिवाळ्यात फिट वुलन टॉपसोबत पेअर करून आरामात घालू शकता. मुलांसाठी अक्षय कुमारचा लूक देखील कुल दिसण्यासाठी परफेक्ट आहे. पण सोबत जॅकेट पेअर करणे सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर थंडीत कुडकुडत बसाल.