Home मनोरंजन रेखाच्या सौंदर्यावरून नजरच हटेना!

रेखाच्या सौंदर्यावरून नजरच हटेना!

0 second read
0
0
40

no images were found

रेखाच्या सौंदर्यावरून नजरच हटेना!

 

रेखा आणि साडी हे समीकरण म्हणजे कायम १००% हिट. ‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये रेखाने हजेरी लावत पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाची खूपच चर्चा आहे. रेखाने विकीच्या चित्रपटाच्या वेळी काळी कांजीवरम साडी नेसत हजेरी लावली आणि पुन्हा एकदा आपल्या सौंदर्यासाठी चर्चेत आली आहे.
६० वर्षीय रेखाचे सौंदर्य या कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. कोणत्याही कार्यक्रमात जाताना साडी हीच फॅशन रेखाची असते आणि प्रत्येक कार्यक्रमाचा लाईमलाईट रेखावर असणं हे तिचं वैशिष्ट्य आहे. कांजीवरम साड्यांचे वेगवेगळे डिजाईन तुम्हाला जर शोधायचे असेल तर रेखाचा प्रत्येक लुक प्रेरणात्मक ठरतो.
रेखाने यावेळी गोल्डन बॉर्डर असणारी काळी कांजीवरम साडी नेसली होती. तर पदरावर संपूर्ण गोल्डन आणि ब्लॅक कामगिरी करण्यात आली आहे. या साडीने आणि रेखाच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधले. पदरावर गोल्डन वर्क करण्यात आलेली ही कांजीवरम अत्यंत रॉयल दिसत आहे. तर रेखाने ती उत्तमरित्या कॅरी केली आहे. तर यासह तिने षटकोनी शेप असणारा ब्लाऊज परिधान केलाय.रेखाची पेटंट हेअरस्टाईल म्हणजे आंबाडा आणि केसात माळलेले खूप गजरे. तिचा हा लुक म्हणजे प्रत्येकाचं मन जिंकून घेणारा ठरतो. अनेकदा फॅशन करताना ‘रेखासारखी तयार हो’ असं म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ हाच असतो की, साधेपणातही अत्यंत सुंदर दिसता येतं. आंबाड्यात माळलेल्या या गजऱ्यांनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रेखाने या कांजीवरम साडीसह टेम्पल ज्वेलरी घातली आहे. गळ्याच्या जवळ असणारा टेम्पल डिझाईनचा नेकलेस, टेम्पल डिझाईन असणारे गोल्डन झुमके आणि हातात गोल्डन आणि साडीला मॅच होणाऱ्या या खूप बांगड्या घालत रेखाने दागिन्यांचा लुक पूर्ण केलाय. रेखा यामध्ये एखाद्या अप्सरेइतकीच सुंदर दिसत आहे.
आपल्या या कांजीवरम साडीसह रेखाने नेहमीसारखाच बोल्ड मेकअप केलाय. हेव्ही मेकअपमध्ये तिने फाऊंडेशन, त्यावर कॉम्पॅक, हायलायटर, जाड काजळ, आयलायनर, मस्कारा, आयलॅशेस, आयशॅडो, सिंदुर, टिकली आणि डार्क लाल लिपस्टिकचा उपयोग केलाय. रेखाचा हा लुक म्हणजे काळजावर थेट वार करणारा आहे.
साडीसह रेखा नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलची पोटली कॅरी करते. यावेळी काळ्या कांजीवरम साडीसह रेखाने ब्लॅक अँड गोल्डन पोटली हातात घेतली आहे. रेखाचा हा लुक नेहमीच सुंदर आणि अप्रतिम असतो. आपल्या चाहत्यांना रेखा कधी फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत नाराज करत नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…