no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा चार राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मान
कसबा बावडा /वार्ताहर : एआयसीटीई व एज्युस्कील कनेक्ट-२०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेक्स्ट जनरेशन स्कील कॉन्क्लेव्ह या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने व्हर्च्युअल इंटर्नशिपमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी कौशल्य विकास धोरणाअतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. शोभा बी. पाटील यांना वूमन लीडरशिप अवार्ड, प्रा. अजिंक्य एस. यादव यांना एज्युकेटर एक्सलंस अवार्ड व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी संस्था तसेच एज्युस्कील इंटर्नशिपमध्ये सर्वाधिक इंटर्नशिपसाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते, एआयसीटीईचे चेअरमन प्रा. टी. जी. सीतारामन, डॉ. राजीव कुमार, प्रा. रमेश उन्नीकृष्णन, डॉ. यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.
या इंटर्नशिपमध्ये आजपर्यंत महाविद्यालयाच्या हजारहून अधिक विद्याथ्यांनी सहभागी होऊन स्वतःचे कौशल्य विकसित केले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यावेळी दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी अभिनंदन केले.