
no images were found
एड्स जनजागरण प्रभातफेरीचे शनिवारी आयोजन
कोल्हापूर : जागतिक एड्स दिना निमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक, सी.पी. आर. हॉस्पिटल कोल्हापूर, यांच्या वतीने दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता सी.पी.आर, हॉस्पिटल, कोल्हापूर येथून एच.आय.व्ही. एड्स जनजागरण प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी दिली.
दि. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या औचित्याने दरवर्षी जिल्हा एड्स नियंत्रण विभागातर्फे जनजागृती फेरी, तसेच प्रबोधनपर रॅली, व्याख्याने, आरोग्य शिबीरे, पथनाट्ये, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन युवा वर्ग तसेच जोखमीचे गट व इतर सर्व वयोगटासाठी करण्यात येत असते. यंदाच्या जागतिक एड्स दिनाचे ब्रीदवाक्य “Let Communities Lead”(आता नेतृत्व समुदायाचे) अशी आहे.