Home राजकीय द्वेषमुक्तीसाठी मोदींचा पराभव आवश्यक! -राहुल गांधी

द्वेषमुक्तीसाठी मोदींचा पराभव आवश्यक! -राहुल गांधी

2 second read
0
0
41

no images were found

द्वेषमुक्तीसाठी मोदींचा पराभव आवश्यक! -राहुल गांधी

 

‘‘देशातील द्वेषाचे वातावरण संपवण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे आवश्यक आहे,’’ असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. तेलंगणामधील नामपल्ली येथे एका निवडणूक सभेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), पंतप्रधान मोदी आणि कट्टरपंथीयांनी देशभर द्वेष पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसने आपल्या ‘भारत जोडो यात्रे’त ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान खुले करण्याचा’ नारा दिला होता, याची आठवण राहुल यांनी यावेळी करून दिली. ‘बीआरएस’, भाजप आणि ‘एआयएमआयएम’ संगनमताने परस्परपूरक काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“भाजपा मागील तीन दशकांपासून प्रयत्न करत होती की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दिल्लीत वक्तव्य
आपण पंतप्रधान मोदींविरोधात लढत असल्यामुळे आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाल्याचा दावा करून राहुल म्हणाले, की ‘‘मानहानी प्रकरणात एखाद्या व्यक्तीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी निवासस्थान हिसकावले गेले’’.हा लढा वैचारिक आहे आणि मी त्यात तडजोड करू शकत नाही, असे सांगून राहुल यांनी त्यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसींविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत? ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’सारख्या सरकारी तपास यंत्रणा नेहमीच आपला पिच्छा पुरवतात. पण ओवेसी यांच्यावर कोणत्याही यंत्रणेने आतापर्यंत कारवाई केली आहे का? ओवेसींविरुद्ध एकही गुन्हा-खटला दाखल का झालेला नाही? ओवेसी पंतप्रधान मोदींना मदत करतात, हेच या मागचे खरे कारण आहे असे राहुल म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर …