no images were found
मुख्यमंत्र्यांच्या शिवीगाळ करणे प्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
मुंबई : शिवसेना उबाठा गटातर्फे भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थानातील प्रचारावेळी भाजपच्या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेल्या ‘हिंदू ह्रदय सम्राट’ शब्दावरुन माजी महापौर दत्ता दळवी यांनी या मेळाव्यात शिवीगाळ केली होती.
मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक एप्रिल 2022 ला बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा देखील समावेश होतादरम्यान, सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी खासदार संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला दाखल होत असल्याची माहिती मिळतेय
भा.दं.वि कलम १५३ (अ), १५३ (ब), १५३ (अ) (१) सी, २९४, ५०४, ५०५ (१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.