
no images were found
पूजा सावंतचा चाहत्यांना सुखद धक्का
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आता चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात तिने असं म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.
आणखी वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…
“. माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. असे पूजा सावंतने म्हटले आहे.पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
दरम्यान पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत