no images were found
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीत
मराठा आरक्षणासाठी राज्यात कुणबी जातप्रमाणपत्र नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात आता याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.
मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे दिसत आहेत. सोबतच कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहिती असल्याने ते विषेश पुढाकार घेताना दिसत आहेत. अशात आज दुपारी ३ वाजता संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये केंद्रीय मागासवर्ग आयोगात आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत.