
no images were found
विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही-राहुल नार्वेकरां
सिंधुदुर्ग : सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये,असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले.
सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं.या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.