no images were found
महिला दिनानिमित्त सोनी सबवरील कलाकारांच्या प्रतिक्रिया
जसजसा महिला दिन जवळ येतो, आपण महिलांचे सामर्थ्य, चिवटपणा आणि यशाचा उत्सव जगभरात साजरा करत असतो. आजच्या दूरचित्रवाणीच्या परिदृश्यात महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. त्यासोबतच पडद्यावरील महिला पात्रांच्या चित्रणास नवा आकार देणारा उत्थानशील कंटेंट प्रदर्शित करणे अगत्याचे बनले आहे. सोनी सब वाहिनीने आपल्या विविध मालिकांच्या माध्यमातून पुरोगामी मते मांडली आहेत तसेच चाकोरीबद्धतेला आव्हान देणाऱ्या आणि परिवर्तनाची पुरस्कार करणाऱ्या सशक्त व्यक्तिमत्त्वांच्या रूपात महिलांचे चित्रण करण्यात आले आहे. चला तर मग, महिला दिनाच्या औचित्याने सशक्त महिला व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या उल्लेखनीय अभिनेत्रींकडून मांडण्यात आलेल्या विचारांचा मागोवा घेऊयात.
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाची भूमिका साकारणारी अभिनेत्री करुणा पांडेय म्हणाली की,
आपण महिलादिन साजरा करत असताना नागरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांत महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वावर विचार करूयात. त्यांना आपल्या स्वत:च्या निवडी ठरवण्याचे आणि आपल्या नियतीला आकार देण्याचे स्वातंत्र्य मिळेल, हेदेखील सुनिश्चित करूया. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहेच, त्यासोबतच मुक्ततेलाही महत्त्व आहे – महिलांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी करण्याचेही स्वातंत्र्य असले पाहिजे. कुटुंबातील सदस्य किंवा सामाजिक अपेक्षांचे नियंत्रणाचे ओझे वागविल्याविना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असणे हाच खऱ्याखुऱ्या सक्षमीकरणाचा वास्तविक अर्थ आहे. जेथे महिला निर्भिड, धाडसी आणि स्वत:च्या निवडी करण्यास स्वतंत्र असतील, अशी आशा मला भविष्याकडून आहेत.
सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत वंदनाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री परिवा प्रणती म्हणाली की,
माझ्यासाठी महिला दिन हा प्रत्येक महिलेला स्वत:साठी उभे राहण्याचा आणि त्या ज्या आहेत ते स्वीकारण्याचाच उत्सव नाही तर आजच्या आधुनिक जगात कित्येक महिला सामोरे जावे लागत असलेल्या मूक संघर्षांना ओळखण्याच्या बाबतीतही आहे. प्रगती आणि आधुनिक जीवनशैलीत राहत असतानाही असंख्या महिला आपल्या इच्छा अन् स्वप्नांशी तडजोड करत जगत असतात. या महिलांना प्रेरित करणे, पाठबळ देणे आणि त्यांच्यासाठी चीअरलीडर्स बनणे तसेच त्यांना स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्यासाठी सक्षम बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सोनी सबवरील आंगन सपनो का मालिकेत पल्लवीचे पात्र साकारणारी अभिनेत्री आयुषी खुराना म्हणाली की,
महिला दिनाच्या खूप शुभेच्छा! आजचा दिवस आपल्यातील अप्रतिम स्वत्वाचा स्वीकार करण्याबद्दलचा आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे असो की आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे असो वा आपल्या आवडींचा पाठपुरावा – बस त्यासाठी सरसावून पुढे जा! जसजसे तुम्ही एकेक पाऊल टाकून आपल्या प्रवासात पुढे सरकता, आपल्या नशीबाला आकार देण्याचा आत्मविश्वास तुमच्यात संचारतो. इतकेच नव्हे तर जेथे प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल, अशा जगातही तुम्ही योगदान देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा– तुमचा आवाज महत्त्वाचा आहे, तुमची स्वप्ने वास्तविक आहेत आणि तुमच्यातील क्षमताही अमर्यादित आहे. प्रत्येक पथप्रदर्शक, डोळ्यांत स्वप्ने असलेली आणि निसर्गाच्या शक्तीला महिला दिनाच्या शुभेच्छा. तुमच्या कथेला आकार देण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तर मग येथे उग्र, उन्मुक्त आणि विलक्षणपणे राहा!
सोनी सबवरील आंगन सपनो का मालिकेत दीपिकाची भूमिका चितारणची अभिनेत्री नीता शेट्टी म्हणाली की,
मला वाटते की दररोजच स्त्रीत्वाचा दिन साजरा केला गेला पाहिजे. हा दिवस केवळ इतिहास बदलणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करण्यापुरताच नाही. उलट आपल्या नव्या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहावी आणि जगात अशक्य असे काहीच नाही, हे समजावून सांगत त्यांना प्रोत्साहित करण्याचाही आहे. या दिवशी आपण प्रत्येक ठिकाणी महिलांचे सामर्थ्य, दृढनिश्चय आणि चिवटपणाचा उत्सव साजरा करत असतो.
सोनी सबवरील पश्मिना – धागे मोहब्बत के मालिकेत पश्मिनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा शर्मा म्हणाली की,
महिलांच्या रूपात आपण सर्व आव्हानांवर मात करणे आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या उपजत क्षमता घेऊनच जन्माला आलेलो असतो. फक्त आपल्यातील अंतःप्रेरणेवर भरवसा ठेवा आणि कुठलेही भय न बाळगता तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. आपल्यातील त्रुटींकडे अडचणी म्हणून पाहण्याऐवजी आपण आपल्या वैयक्तिक विकासाच्या संधी म्हणून त्यांचा स्वीकार केला गेला पाहिजे. या महिला दिनाच्या औचित्याने चला आपल्या सर्वांच्या मनातील शक्तीचा उत्सव साजरा करूयात. तसेच आपल्या हृदयात ज्याची अतीव इच्छा आहे, त्याच मार्गावरून पुढील मार्गक्रमण करूयात.