no images were found
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांची कोल्हापूर जिल्ह्याला भेट
कोल्हापूर : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक सौरभ राव मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ही त्यांची पहिली भेट असून या भेटी दरम्यान याच दिवशी दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री शाहुजी सभागृहात
जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, प्रतिनिधी यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. मतदार यादीबाबत काही सूचना असल्यास दि. 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत dydeokolhapur@gmail.com या ई-मेल वर पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांना पुणे विभागातील 05 जिल्ह्यांसाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.