no images were found
न्यू पॉलिटेक्निकमध्ये अर्थमुव्हींग इक्विपमेंट ऑपरेटर प्रशिक्षण
कोल्हापूर ( उंचगाव ) 🙁 प्रतिनीधी) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), न्यू पॉलिटेक्निक आणि अर्थमुव्हींग मशिनरी ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ट्रेनिंग प्रोग्राम ऑन हेवी अर्थमुव्हींग इक्विपमेंट ऑपरेटर’ या दोन आठवड्याच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, न्यू पॉलिटेक्निकच्या ताफ्यात दाखल झालेल्या विद्यार्थी वाहतूकीच्या नवीन बसचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील होते. यावेळी थोटे म्हणाले, महाराष्ट्रात प्रथमच अर्थमुव्हींग इक्विपमेंट ऑपरेटर प्रशिक्षणाचा कोर्स सुरू करण्याचे श्रेय न्यू पॉलिटेक्निकला जाते. या कोर्सची संकल्पना प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी मांडली. न्यू पॉलिटेक्निकसोबत अजुनही काही उपयुक्त कोर्सेस सुरू करण्याचा मानस आहे. या प्रशिक्षणार्थीना शासकीय अनुदान व बॅंकांची दारे खुली होतील.
अर्थमुव्हींग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले, कन्स्ट्रक्शन व्यवसाय क्षेत्रास अशा कोर्सची नितांत गरज होती. या प्रशिक्षणामुळे ऑपरेटर्सच्या कामाचा दर्जा उंचावेल. या कोर्समधील प्रशिक्षणार्थीना नोकरी देण्यास असोसिएशनचे संपूर्ण सहकार्य असेल. या ऑपरेटर्सना आमच्याकडे रू. २० ते २५ हजार वेतन मिळेल.
डाॅ. दाभोळे यांनी स्कील, स्केल व स्पीड या त्रिसूत्रीनुसार अशा प्रशिक्षण कार्यक्रमांत अल्पशिक्षित होतकरू युवकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सामावून घेवू आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक दर्जेदार सुविधा पुरवू अशी ग्वाही दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात के. जी. पाटील म्हणाले शासन, शैक्षणिक संस्था व व्यावसायिक एकत्र आले तर समाजघटकांचा उत्कर्ष साधणारे उपक्रम निर्माण होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून या प्रशिक्षण कोर्सकडे पाहता येईल. अशा उपक्रमांस संस्थेचे पाठबळ राहील.
न्यू पॉलिटेक्निक व अर्थमुव्हर्स यांच्यात दुवा साधणारे रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रशिक्षण कोर्सची गरज व उद्दिष्टे नमुद केली. अर्थमुव्हर्सने नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एमसीईडी व न्यू पाॅलिटेक्नीक यांच्यात सामंजस्य करार झाला.
सूत्रसंचालन प्रा. मोहन शिंदे, आभारप्रदर्शन प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमास एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील, प्रिन्स शिवाजीचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, अर्थमुव्हींग असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाळे, संचालक अभय देशपांडे, सुरज बोडके, संजय कसबेकर, सुंदर तोरस्कर, सतिश घाटगे, प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक व स्टाफ उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता प्रा. माधुरी पाटील यांच्या आवाजातील वंदेमातरम गायनाने झाली.