Home शासकीय कुणबी जातीचे पुरावे, सनदा, राष्ट्रीय दस्तावेज, अभिलेखे 24 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत – राहुल रेखावार

कुणबी जातीचे पुरावे, सनदा, राष्ट्रीय दस्तावेज, अभिलेखे 24 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत – राहुल रेखावार

12 second read
0
0
29

no images were found

कुणबी जातीचे पुरावे, सनदा, राष्ट्रीय दस्तावेज, अभिलेखे 24 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत – राहुल रेखावार

                   कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले 1967 पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कुणबी जातीच्या पुराव्याची 1967 पूर्वीची कागदपत्रे या विशेष कक्षात दिनांक 21 ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा नियोजित असून त्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात दिनांक 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत.

नागरिकांकडून सादर होणारी कागदपत्रे, पुरावे, अभिलेखे प्राप्त करुन घेण्यासाठी विशेष कक्षासाठी नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, महसुल सहाय्यक, अधीक्षक, लिपिक या दर्जाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नागरिकांनी त्यांच्याकडील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले 1967 पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे कार्यालयीन वेळेत या विशेष कक्षात सादर करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

Load More Related Articles

Check Also

करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार

    करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार   कोल्हापूर, (प्रतिनिधी):– तत्त्वज्ञा…