
no images were found
लिंगायत, मारवाडी, अन्य जातींच्याही कुणबी नोंदी; सरकारची डोकेदुखी वाढली
मुंबई : मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील पूर्वजांच्या जुन्या नोंदी शोधण्याची मोहीम राज्यभरात हाती घेण्यात आली आहे. लिंगायत, मारवाडी व अन्य काही जातींमधील नागरिकांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. ज्यांना ओबीसीमध्ये आरक्षण नाही, अशा जातींनीही ते मागितले, तर सरकारपुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कुणबी-मराठा नोंदींची संख्या १९ हजारांवर गेली असून त्याचा लाभ दोन-तीन लाख नागरिकांना होईल, असा अंदाज आहे.