
no images were found
दिव्यांगानी बनवलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री
कोल्हापूर : समाज कल्याण दिव्यांग विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हयातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश दिवे, पणत्या, उटणे, मोठे आकाश कंदील व इतर विविध वस्तुंचे स्टॉल जिल्हा परिषद कोल्हापूर येथे लावण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार व दिव्यांग विभागाच्या साधना कांबळे व जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे सर्व मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये वि.म.लोहिया कर्णबधिर विद्यालय कोल्हापूर, रोटरी डेफ स्कूल तिळवणी, वैद्य व्यंकटराव यादव कर्णबधिर विद्यालय शिरोळ, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र कोल्हापूर, स्वयंम उद्योग केंद्र कसबा बावडा, जिज्ञासा विकास मंदिर व राही पुनर्वसन केंद्र कोल्हापूर, मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कागल, सन्मती मतिमंद विकास केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण उत्पादन केंद्र इचलकरंजी, हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर या दिव्यांग शाळा व कार्यशाळा सहभागी झाले.