न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीचे शिवजी मराठा हायस्कूल येथे आरोग्य शिबिर संपन्न.
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.सुरवातीला प्रा. पियुषा नेजदार यांनी रक्तगट, त्यातील विविध घटक, त्यांचे महत्व, रक्तदानाचे महत्व यांची सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.दिव्या शिर्के, प्रा. वैष्णवी निवेकर, इतर स्टाफ व विद्यार्थिनीच्या सहभागातून रक्तगट तपासणी करण्यात आली.
सदरचा उपक्रम न्यू वुमन्स फार्मसी व शिवजी मराठा हायस्कूल यांच्या संयुक्तं विद्यमानाने राबवण्यात आला.सदरच्या उपक्रमांचे नियोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या संक्पनेतून करण्यात आला.सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री के. जी. पाटील. , व्हा. चेअरमन श्री. डी.जी.किल्लेदार., संचालिका सौ. सई खराडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.