Home क्राईम आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवले, अंगावर काटा आणणारी घटना

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवले, अंगावर काटा आणणारी घटना

2 second read
0
0
103

no images were found

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवले, अंगावर काटा आणणारी घटना

आईला बेशुद्ध करून चार महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक  : नाशिकमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या गंगापूर रोड धृवनगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील गंगापूर सातपूर लिंक रोड वर असलेल्या धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या..

आई सांयकाळी दूध आणालया गेली असताना भूषण यांची पत्नी आणि चिमुकली घरी होत्या. यावेळ एक पंजाबी ड्रेस घातलेली महिला घरात घुसली. तिने धृवांशीच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. . रुमाला गुंगीचे औषध लावलेले असल्याने आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर विकृतीच्या महिलेने घरातच पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या निष्पाप व निरागस चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला.भूषण यांची आई दूध घरी घेऊन आल्यानंतर सून बेशुद्धावस्थेत असल्याचं पाहिलं. तर नात धृवांशी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. या घटनेची माहिती त्यांनी शेजाऱ्यांना दिली. धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच धृवांशीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. हत्येच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करत होते. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …