no images were found
शहरातील मोकाट कुत्र्यांचे १०० दिवसात निर्बीजीकरण करा – राहूल चिकोडे
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील आठवड्यात आवाज उठवण्यात आला होता. यावेळी उपायुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिले होते याच अनुषंगाने आज भाजपा शिष्ट मंडळाची मोकाट कुत्र्यांच्या विषयात बैठक संपन्न झाली. महानगरपालिकेचे निर्ढावलेले अधिकारी, पालिकेतील भोंगळ कारभार, वरिष्ठ अधिकारी असताना देखील ज्युनिअर अधिकाऱ्यांना या मिटिंगचा उद्देश माहित नसणे अशी गंभीर बाब बैठकीच्या सुरुवातीला दिसून आली. आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना बैठक कोणत्या उद्देशाने आयोजित केली आहे याची माहिती नव्हती. भाजपाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि या विषयातील कागदपत्रे देखील अधिकारी वर्गांनी सोबत आणण्याची तस्दी देखील घेतली नव्हती याबद्दल पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे यांनी विजय पाटील यांना धारेवर धरत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या बैठकीत का आणले नाही असा सवाल उपस्थित केला. महानगरपालिका या विषयात अपयशी ठरले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याविषयात सखोल चौकशी होऊन विजय पाटील यांच्यावर कोणती कारवाई करणार तसेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा किती दिवसात होणार याबाबत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना जाब विचारला.
रस्त्यांवर ठिक-ठिकाणी असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यातून होणारा कचरा यामुळे ही मोकाट कुत्री हिंस्र बनत चालली आहेत याकडे कोणाचेच लक्ष नाही. इतर राज्यात कुत्र्यांचे शंभर टक्के निर्बीजीकरण होत असेल तर कोल्हापूर सारख्या शहरात याचे काम पूर्णत्वास का जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. महापालिकेच्या वतीने रोज किती मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण होते या प्रश्नावर आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या उत्तरावर डॉ. कापडी व वकील बद्दी यांनी सखोल विश्लेषण करून आरोग्य अधिकारी यांना निरुत्तर केले.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉग स्कोडचे नंबर महापालिकेने सोशल मिडिया, प्रिंट मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून नागरिकांना अशा सुविधा पुरवण्याचे मागणी केली त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल असा सवाल आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना केला.
यावेळी अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, राजसिंह शेळके, रूपाराणी निकम, उमा इंगळे, संतोष भिवटे, अनिल कामत, विजय आगरवाल यांनी मोकाट कुत्र्यांच्या विषयात महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना अनेक सवाल करून निरुत्तर केले.
यानंतर आरोग्य अधिकारी विजय पाटील यांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया येत्या १०० दिवसात पूर्ण करण्यासाठी महपालिकेच्या वतीने सर्वते प्रयत्न केले जातील त्याचबरोबर भाजपाच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत्या १० दिवसात देण्यात येतील असे सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना याविषयातील गांभीर्य अधोरेखित करून पुढील बैठकीमध्ये अभ्यासपूर्ण उपस्थित राहण्यासाठी सूचित केले अन्यथा भाजपा याविषयात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला.
याप्रसंगी संजय सावंत, सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अजिंक्य चव्हाण, विराज चिखलीकर, दीपक जाधव, गणेश देसाई, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, भारत काळे, अतुल चव्हाण, रोहित पवार, रमेश दिवेकर, अमर साठे, संगीता खाडे, प्रदीप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, वैभव माने, अनिल कामत, संतोष माळी, अशोक लोहार यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.