Home मनोरंजन उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी?

उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी?

1 second read
0
0
56

no images were found

उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी?

उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजासाठी लोकप्रिय आहे, परंतु कधीकधी तिच्या फॅशनमुळे तिला खूप ट्रोलही केलं जातं. पण यामुळे उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती तरीही हटके फॅशन सतत करत असते. दोन दिवसांपूर्वी उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती भूल भुलैयाच्या छोटा पंडितच्या लूकमध्ये दिसली होती. आता उर्फीच्या या फॅशन तिच्या जीवाला धोका निर्माण झाली आहे.
छोटा पंडितचा लूक करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. अभिनेत्रीला यामुळे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. उर्फी जावेदने 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी इन्स्टाग्रामवर तिचा हॅलोवीन पार्टीचा लूक शेअर केला, ज्यामध्ये तिने केशरी रंगाचं धोतर घातलं होतं चेहऱ्यावर लाल रंग लावला होता, गळ्यात फुलांची माळ घातली होती आणि कानात अगरबत्ती लावली होती.
अभिनेत्रीला आता या लूकनंतर मेलवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. इतकंच नाही तर अभिनेत्रीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.उर्फीने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
एका व्यक्तीने उर्फीला मेल केला आहे. यामध्ये तू अपलोड केलेला व्हिडीओ डिलीट कर, नाहीतर तुला मारायला वेळ लागणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसर्‍या व्यक्तीने मेल उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे. भर चौकात गोळ्या घालेन असं म्हटलं आहे.
उर्फी जावेदसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला अशा धमक्या आल्या होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या कार्यालयातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला होता आणि सांगितले होते की, दिग्दर्शक नीरज पांडेच्या सहाय्यकाने तिचा छळ केला होता. त्यादरम्यान कपड्यांवरून तिला ही धमकी मिळाली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री 

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यम…