no images were found
गल्फ सिनट्रॅक आणि इंडिया बाईक वीक घेऊन आले ‘चाय-पकोडा राइड्स’ ची जादू
कोल्हापूर, : ल्युब्रिकंट्स उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी, गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने कोल्हापूरमध्ये सादर केली चाय-पकोडा राईड. आशिया खंडातील प्रीमियर मोटरसायकलिंग फेस्टिवल म्हणून नावाजल्या जाणाऱ्या इंडिया बाईक वीकच्या इकोसिस्टिम मधील एक महत्त्वाची परंपरा आहे चाय-पकोडा राईड! इंडिया बाईक वीकच्या दहाव्या एडिशनची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये चाय पकोडा राइड्सने झाली आणि त्यासोबतच सुरु झाला या वर्षीचा, मोटरसायकलिंग साहस, सौहार्द आणि संस्कृतीचा सोहळा. यंदा गल्फच्या सहयोगाने आयोजित केली जात असलेली ही इव्हेन्ट रायडर्स आणि दर्शकांसाठी अतिशय रोमांचक अनुभव ठरणार आहे.
कोल्हापूर चाय-पकोडा ब्रेकफास्ट राईडला प्रचंड प्रतिसाद लाभला. या भागातील तब्बल ४७० पेक्षा जास्त उत्साही रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते. विविध पार्श्वभूमी असलेले रायडर्स आपल्या वेगवेगळ्या मोटरसायकल्स घेऊन राईडसाठी आलेले होते, यामध्ये गडगडाट करणाऱ्या हार्लेजपासून वेगवान केटीएम आणि यामाहापर्यंत अनेक बाईक्स कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, केएसबीपी गार्डनजवळ बायकर्स चौक येथे जमा झाल्या होत्या. तिथून त्यांनी कोगनोली टोल प्लाझाजवळ विराज जंक्शनपर्यंत २० किमी लांब प्रवासाला सुरुवात केली.
गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे हेड ऑफ मार्केटिंग अमित घेजी म्हणाले की दहाव्या इंडिया बाईक वीकच्या सहयोगाने नाशिकमध्ये ही उत्साहवर्धक चाय-पकोडा राईड प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या राइड्स मोटरसायकलिंग समुदायाच्या उत्साहाचे प्रतिबिंब आहेत, त्यामधून सौहार्दाच्या भावनेला व खुल्या रस्त्यांबाबतच्या प्रेमाला प्रोत्साहन मिळते. देशभरातील मोटरसायकलप्रेमींसाठी रायडींग अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी गल्फ वचनबद्ध आहे. आमचा हा सहयोग ही वचनबद्धता दर्शवतो. रायडर्सना प्रेरित करणे आणि पाठिंबा देणे हा आमचा उद्देश आहे, बायकिंगची आवड पूर्ण करण्याबरोबरीनेच त्यांना सुरक्षित व आनंददायी प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.
गल्फ मोटरसायकलिंग कम्युनिटीप्रती दीर्घकाळापासून वचनबद्ध आहे, त्यांच्या नेमक्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक, उच्च दर्जाचे ल्युब्रिकंट्स ही कंपनी पुरवते. इंडिया बाईक वीकच्या सहयोगाने गल्फ बायकर्स आणि राईडप्रेमींना उत्तम अनुभव मिळावा, सर्वांसाठी मोटरसायकलिंगच्या अनुभवात सुधारणा व्हावी यासाठी उत्सुक आहे.