no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
कसबा बावडा ( प्रतिनीधी ) : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहत संपन्न झाला. संस्थेच्या यशामध्ये या माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान असून पुढील पिढीलाही त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी केले.
राज्यभरात १६२ हून अधिक संस्थांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपची ओळख आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी या ग्रुपचे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे १९८४ मध्ये सुरु केले होते. या महाविद्यलयातून उत्तम अभियंते बनून देश- विदेशात नोकरी, व्यवसायात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यानाचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास चारशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून जुन्या आठवणीना उजाळा दिला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यानी आस्थेने त्यांची विचारपूस केली. संस्थेच्या यशात आपले मोठे योगदान आहे. यापुढेही सतत संपर्कात राहून नवीन विद्यार्थ्याना मार्गदर्शन करावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा पुरविण्यास आमचे नेहमीच प्राधान्य असल्यचे सांगितले. युवकांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या ५ व ६ नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रख्यात स्थापत्य अभियंते अजितसिंह देसाई यांच्यासहित विविध शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपळ्या यशस्वी करियर मध्ये डी. वाय.पाटील संस्थेचे अमूल्य योगदान असल्यचे सांगितले. सस्थेने फक्त शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर एग्रीकल्चर, हेल्थकेअर, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, वेलनेस, को-ऑपरेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, स्पोर्ट्स आणि इंडस्ट्रीज अशा विविध क्षेत्रात संपादित केलेल्या निर्भेळ यशाबद्दल त्यानी डॉ.संजय पाटील आणि ऋतुराज पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. कार्यकारी संचालक, डॉ. ए.के. गुप्ता यांनी डी.वाय पाटील ग्रुप ने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत संस्थेने केलेल्या विविध प्रगतीपर कार्याची अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले. माजी विद्यार्थी हे कोणत्याही महाविद्यालयाचे प्रमुख आधारस्तंभ असतात आणि महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड होण्यामध्ये त्यांचे योगदान वादातीत असते असे सांगत माजी विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाचा डी. वाय. पाटील समूहाला अभिमान असल्याचे सांगितले.
यावेळी आर्किटेक्चर, केमिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, आय.टी., इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन आदी शाखेचे माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संस्थेच्या विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन, सहकार्य करणेस कटिबध्द आहोत अशी ग्वाही दिली.
सायंकाळी आयोजित केलेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये चित्रफिती, छायाचित्रांद्वारे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी जागवत रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. महाविद्यालयाने सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सूत्रसंचालन प्रा.राधिका ढणाल आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी केले तर आभारप्रदर्शन सहयोगी अधिष्ठाता, डॉ. मनीषा भानुसे यांनी केले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांच्यासह सर्वच प्राध्यापक, कर्मचारी व समिती सदस्य व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.