Home सामाजिक संत्र्यावर 180% निर्यातशुल्क, बांगलादेशशी चर्चा सुरु -गडकरीं

संत्र्यावर 180% निर्यातशुल्क, बांगलादेशशी चर्चा सुरु -गडकरीं

1 second read
0
0
32

no images were found

संत्र्यावर 180% निर्यातशुल्क, बांगलादेशशी चर्चा सुरु -गडकरीं

 

मुंबई : बांगलादेशने संत्र्यावर 180 टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे बांगलादेशला होणारी संत्र्याची निर्यात थांबलीय. यामुळे विदर्भातले संत्रा उत्पादक अडचणीत आलेत. मात्र यासंदर्भात बांगलादेशाशी चर्चा सुरू असल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. मात्र कोणत्या वस्तूवर किती आयात शुल्क लावायचं हा त्यांचा देशांतर्गत विषय असल्याचं गडकरी म्हणाले.
लाखो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात अनेक वेळेला तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेशने वाढवलेल्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र संत्रा उत्पादकांनी देशांतर्गत बाजारासह परदेशातले इतर पर्यायही शोधायला हवे असं गडकरी म्हणाले.
बांगलादेशने वैदर्भीय संत्र्यावर 180% आयशुल्क आपल्या लावल्याने बांगलादेश ला आपली निर्यात थांबली आहे. त्यासंदर्भात बांगलादेश सरकारसोबत ही चर्चा सुरू असून बांगलादेशचे पंतप्रधान आणि परदेश व्यवहार मंत्र्यासोबत मी बोललो असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र कोणत्या वस्तूवर किती आयात शुल्क लावायचे हा अखेरीस त्यांचा देशांतर्गत विषय असल्याचे गडकरी म्हणाले. दरम्यान, संत्रा उत्पादकानी देशांतर्गत बाजारासह परदेशातील इतर नवीन बाजार शोधण्याची गरज आहे. मागील वर्षी दुबईच्या बाजारात वैदर्भीय संत्रा विकला गेला आहे. भविष्यात तसेच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले
बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावल्यामुळे विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशी आयात शुल्क आणि त्याबद्दल केंद्र सरकारची उदासीनता लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे. लवकर याच्यातून मार्ग काढला गेला नाही तर भविष्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहव्या लागतील अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
विदर्भातील हजारो संत्रा बागांमध्ये पिकलेल्या गोड, रसाळ संत्र्यापैकी तब्बल अडीच लाख टन संत्रा यंदा बाजारपेठेत जाण्याऐवजी शेतात पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण बांगलादेशाने भारतीय संत्र्यावर तब्बल 88 रपये प्रति किलो एवढं आयात शुल्क लावले आहे.
बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावल्यामुळे विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशी आयात शुल्क आणि त्याबद्दल केंद्र सरकारची उदासीनता लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे.
दरम्यान, विदर्भातील तब्बल सहा लोकसभा मतदारसंघात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळं संत्रा उत्पादकांचा रोष येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपला परवडणारा नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …