
no images were found
सदावर्तेंना संपवायला हवं होतं, संजय गायकवाडांचं वादग्रस्त वक्तव्य
शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी एकेरी उल्लेख करत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “गुणरत्न सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली. त्यांना संपवायला हवं होतं”, असं मत संजय गायकवाडांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (२६ ऑक्टोबर) मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर माध्यमांशी बोलत होते.
संजय गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवालं गेलं. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसंकाय मराठा आरक्षणामुळे यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतं.”
मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…
“गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झालं”
“गुणरत्न सदावर्ते संपले असते, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना मी हेच सांगेन की, हे कमी झालं. सदावर्तेंची चांगली व्यवस्था करायला हवी होती,” असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.