no images were found
आयसीआयसीआय बँकेकडून महापालिकेस 5 इलेक्ट्रीक ॲटो टिप्पर प्रदान
कोल्हापूर :- महापालिकेच्या आरोग्य विभागास आयसीआयसी बँक व आयसीआयसीआय फौंडेशन कोल्हापूर यांच्याकडून शहरातील कचरा उठावासाठी 5 इलेक्ट्रीक ॲटो टिप्पर वाहने आज देण्यात आली. या इलेक्ट्रीक ॲटो टिप्पर वाहनाचे उदघाटन आमदार ऋतूराज पाटील व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे झोनल मॅनेजर पवन माळवी व रिजनल मॅनेजर प्रकाश मेश्राम यांनी प्रशासक के.मंजूलक्ष्मी व मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड यांच्याकडे सदरच्या गाड्यांची किल्ली सोपविली. हा कार्यक्रम महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील उपस्थित होते.
या ॲटो टिप्पर गाड्या महिंद्रा कंपनीच्या असून यामध्ये 550 किलो कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. या प्रती गाडीची किंमत 6 लाख एकूण 5 ॲटो टिप्परची किंम्मत 30 लाख आहे. ही गाडी 4 तासात 100 टक्के चार्ज होऊन 120 किलोमिटर हि गाडी चालते. या गाडीमध्ये आत्ताच्या कचरा गाडी प्रमाणे ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी दोन वेगवेगळे कप्पे देण्यात आले आहेत. या गाड्या इलेक्ट्रीक असल्या तरी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
शहराच्या मध्यवस्तीतील जे जास्त गर्दीचे वॉर्ड आहेत अशा वॉर्डमध्ये कचरा गोळा करत असताना पुर्वीच्या घंटा गाडीतून कचरा उठाव करण्यास जास्त लोड होत असे. त्यामुळे शहरातील छोट्या छोट्या गल्लीतील कचरा विना प्रदूषण व कमी खर्चात गोळा करता यावा यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी इलेक्ट्रिक कचरा गाडीची संकल्पना आयसीआयसीआय बँकेकडे व्यक्त केली. त्यालाच अनुसरून प्रस्ताव बनवण्यात आला व तो आयसीआयसीआय बँकेच्या सामाजिक बांधिलकीच्या इन्व्हेस्टमेंट कमिटीकडे सादर करण्यात आला. बँकेकडून प्रथमतः पाच गाड्यांची मंजुरी देण्यात येऊन त्या गाडया आज महापालिकेकडे जमा करण्यात आल्या. या इलेक्ट्रीक ॲटो टिप्परसाठी शासकीय बँकींग सुविधेचे रिजनल मॅनेजर विकास देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक गर्व्हमेंट बिजनेस अर्जुन काळे, संस्था बँकीगचे लक्ष्मीकांत स्वामी, आयसीआयसीआय फौंडेशनकडून झोनल हेड दिपक पाटील, विकास अधिकारी मयूर येवला, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेते शारगंधर देशमुख, माजी नगरसेवक भूपाल शेटे, मधूकर रामाने, अर्जुन माने, मोहन सालपे, राजाराम गायकवाड, राहूल माने, धिरज पाटील, ईश्वर परमार, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, दुर्वास कदम, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.