Home Uncategorized चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

2 second read
0
0
34

no images were found

चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

 

चंद्र हा संशोधकांसाठी नेहमीच कुतुहलचा विषय आहे. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. यातच चंद्राचे वय किती? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जातात. मात्र, आता चंद्राचे नेमके वय समजू शकलेले आहे. 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीच्या संशोधनातून चंद्राचे नेमके वय समोर आहे.
1970 मध्ये अमेरिकेने आपली पहिली मानवी चंद्र मोहीम राबवली. NASA चे अपोलो 17 हे यान चंद्रावर पाठवले होते. या मोहिमेच्या माध्यामातून मानवाने पहिले पाऊल चंद्रावर टाकले. या मोहिमे दरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून धूळ तसेच मातीचे नमुने गोळा केले होते. या मातीचे नमुन्याचे संशोधन करुन चंद्राच्या वयाच्या निश्चित आकडा शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.
चंद्राच्या वयाबाबत अनेक दावे केले जात होते. प्रत्यक्षात चंद्र मात्र, 40 दशलक्ष वर्षे जुना असल्याचे उघड झाले आहे. 11 डिसेंबर 1972 रोजी NASA चे अपोलो 17 हे यान चंद्रावर उतरले. यानंतर नासाचे अंतराळवीर यूजीन सर्नन आणि हॅरिसन श्मिट यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक आणि धूळ तसेच मातीचे नमुने गोळा केले. या नमुन्याचे सखोल परिक्षण करण्यात आले. अखेरीस 51 वर्षांनंतर चंद्राच्या वयाचा निश्चित आकडा काढण्यास संशोधकांना यश आहे. नमुन्याच्या नवीन विश्लेषणात चंद्रावरील माती, दगड तसेच धुलीकणांमध्ये झिरकॉन क्रिस्टल्स आढळून आले आहेत. हे झिरकॉन क्रिस्टल्स 4.46 अब्ज वर्ष जुने आहेत. याच्यावरुन चंद्राचे वय देखील 4.46 अब्ज वर्ष जुने असल्याचा दावा केला जात आहे. हे क्रिस्टल्स सर्वात जुने ज्ञात घन पदार्थ आहेत.
आपल्या सूर्यमालेची निर्मीती होत असताना असंख्य खगोलीय घडामोडी घडल्या. पृथ्वी देखील निर्मीतीच्या टप्प्यात होती. अशा वेळेस एक मोठा मंगळाच्या आकाराची एक मोठी वस्तू पृथ्वीवर आदळली यातून चंद्राची निर्मीती झाल्याचा दावा केला जात आहे. नेगौनी इंटिग्रेटिव्ह रिसर्च सेंटरचे वरिष्ठ संचालक आणि शिकागो विद्यापीठातील भूभौतिक विज्ञान विभागातील प्राध्यापक हेक यांनी चंद्राचा पृष्ठभाग कसा तयार झाला याबाबत माहिती देताना सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागावरील कोणतेही स्फटिक हे चंद्र मॅग्मा अर्थात महासागर थंड झाल्यावरच तयार झाले असावेत. संशोधकांच्या मते, नवीन संशोधन अणू प्रोब टोमोग्राफीसह डेटिंग क्रिस्टल्सच्या विश्लेषणात्मक पद्धतीचा प्रथम वापर दर्शविते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…